Thursday, 20 October 2011

पानिपत,,? नव्हे हा आहे विश्वास पथ

पानिपत,,? नव्हे हा आहे विश्वास पथ

आल्याम्तीर कोल्याम्तीर फुं ssss
राज राजेश्वरा,,,,,दूरदेशीच्या पाखरा
परमेश्वरा सांग ssss ,,,,,,
देवा धर्माचे ,जपातापाचे ,                                               

भाऊसाहेब न नेईल तर 

फौज डुबल का जगल,,,,,,,,,,?
फौज डुबल अस तुला वाटत आसल तर ,,,,,,,,,,,,,?
आल्याम्तीर कोल्याम्तीर घु  ssss  
मुखातल पान खाली टाक.
आन डुबणार नसल तर शेपटीवर नाच
आल्याम्तीर कोल्याम्तीर घुईन घुई ssss
आणि पिंजर्यातून पोपटराव बाहेर आले  आजूबाजूच्या
गर्दीकडे पाहत तोंडातल पान खाली टाकल आणि,,,,,,,,,,,,,,,,
एकच हलकल्लोळ उडाला फौज बुडणार फौज बुडणार ssss ,,,,,,,,,,,,,,,
आणि असत्य सत्यात उतरल ,,,,,,केवळ बाजार बुनग्यांमुळे,,,,,,,
अंगावर काटा उभा राहतो हा प्रसंग वाचताना
विश्वास पाटलांच्या कादंबरीतील हा प्रसंग पानिपाताविषयी बरच काही सांगून जातो.
बाजार बुणगे आम्ही त्याही वेळी पोसत होतो आजही,
ह्याच आमच्या स्वभावामुळे आमच्या महाराष्ट्र धर्माच आम्ही ईतक नुकसान करून ठेवलाय ,
कि परप्रांतीयांनीहि ते तितक केल नसेल,,,,
कारण आम्ही सारे भीष्म वंशी,,,,,,,,,,.
त्या सार्या भीष्म वंशीयांच्या चरणी हे माझ पानिपत .
जस मी वाचल, जस मी पाहिलं ,जस मी अनुभवलं तस,,,,,,
हा ईथे तुम्हाला सनावळ नाही भेटणार कारण याच सनावळी च्या नादात आम्ही
नेमका ईतिहास विसरतो  आणि
नापास होतो .
पानिपतावर मी लिहाव ईतका मी मोठा नाही
बरेच जणांनी त्यावर लिहिल आहे .
मराठ्यांच्या चुका दाखवून दिल्यात तसेच त्यांच्या पराक्रमाचे पोवाडेहि हे गायले आहेत .
खरतर हि नियतीचीच ईच्छा होती 

मराठ्यांनी ईतिहासा कडून काही शिकावं .
म्हणून तर पानिपत नेमक कुरुक्क्षेत्रा जवळ  झाल,,,,,
महाभारत,
महाभारत आमच्या मराठ्यांनी वाचालच नसेल अस कस होईल,,,,,,,,?
या कुरुक्क्षेत्रात नेमका भगवान श्री कृष्ण पांडवांच्या बाजूने होता
आणि येथे मराठ्यांच्या बाजूने ,,,,,,,,,,,,,?
ईकडे यमुनेला पाय लावून वसुदेवाला दाखवणारा रस्ता मुरारी नव्हता
या रणांगणात गीता सांगणारा योगेश्वर नव्हता
आणि मराठ्यांकडे ती गीता ऐकून घेणारा अर्जुनही नव्हता
आमच्याकडे होती फक्त शब्दाला जागायची ताकद आणि  निष्ठा .
आणि कुरुक्क्षेत्र आम्हाला ओरडून सांगत होत
रथाच चाक अडकलेल्या कर्णालाही सोडू नकोस ,,,
आणि आम्ही
तरीही  त्या हरामखोर नजीब्याला धर्मपुत्र बनवून बसलो होतो.
हिंदू जेव्हा जेव्हा वरचढ ठरला तेव्हा तेव्हा मुसलमानांनी कांगावा केला
ईस्लाम खतरेमे ,,,,,,,,आणि नजीब्याने नेमक हेच केल
अहमदशा अब्दालीला बोलवलं धर्म वाचण्यासाठी ,,,
पण खरतर राष्ट्रनिर्मिती साठी संपत्तीची गरज असते आणि ती गरज
हिंदुस्थान नक्कीच पूर्ण करेल हा तैमूरलंग पासून बाबरा पर्यंतचा
ईतिहास
अब्दालीला ओरडून सांगत होता या दोघांनीही
हिंदुस्थानाला नागव करण्यातच धन्यता मानली होती.
अब्दाली खरतर याच साठी आला होता.

परंतु याच न्यायाने छत्रपतींनी ज्या कुणा
परप्रांतीयांना लुटलं तर आम्ही त्यांना चोर लुटारू ठरवलं ते शिकवत पानिपत,,,,
आमची भाऊबंदकी तेव्हाही होती आणि आज हि आहेच,
राघोभरारी वृत्ती तेव्हाही होत आजही  आहेच,
आम्ही तेव्हाही दुसर्याच्या घरातील दिवा लावण्यासाठी स्वतःच घर जाळत होतो आजही .
आणि आम्ही गेलो दक्षिणेतून उत्तरेकडे देश वाचवण्यासाठी
अहमदिया करारानुसार देश रक्षणासाठी
मराठ्यांच्या या उदात्त कल्पनेला उत्तरेत योग्य साथ मिली असती तर,,,,,,?
पण आम्ही तेव्हाही प्रगत नव्हत आजही,,,,
कारण रामायण तुम्हाला कस जागाव ते शिकवत
महाभारत कस जगू नये ते शिकवत आणि,,,,,,,,
पानिपत,,,
पानिपत तुम्हाला कस लढाव आणि कस लढू नये ते शिकवत .
दिलेला शब्द कधी कुठे कसा आणि का पाळावा ते शिकवत पानिपत ,,,
एक छत्रपती सोडले तर युध्द शास्त्राची जाण कुणालाच नव्हती ते शिकवत पानिपत,,,,
कोंडीत सापडलेल्या वाघाने कोंडी फोडण्यासाठी चवताळून शिकार्यावर हल्ला करावा आणि,,
सार्या तयारीनिशी टपून बसलेल्या शिकार्याने त्या वाघाचीच शिकार कशी करावी ते शिकवत पानिपत,,,
रणांगनाची माती बदलली कि लढाईच तंत्र  नियम बदलतात ते शिकवत पानिपत,,,,
दुष्मनाला माफ करा पण त्याला विसरू नका ते शिकवत पानिपत ,,,,
आणि आम्ही
"शरण आलेल्याला मरण चिंतु नये या धर्माचे सारे भीष्म वंशी ,,,,
बडी मां अयोध्येचा राजा सुजा  याच्या आईचे बोल नेमके
आहेत ती म्हणते सुजा अरे एकवेळ सैतानावर विश्वास ठेव पण ,,,,,,
त्या नाजीब्यावर नको ....आणि आम्ही.........?
खूप पूर्वी पासून आपल्याकडे ऐकायला मिळत होत
विश्वास गेला पानिपतावर ,पण नाही
काल १४ जानेवारीला त्या पावन भूमीवर जायचं भाग्य लाभल
आणि त्या निमित्ताने काही वाचायलाही मिळाल लक्षात आल कि
विश्वास आम्ही गमावला नाही कमावला ,,,,,,,,
याच पानिपतावर सार सार दैवासकट सार आमच्या विरोधात असताना
आम्ही ज्या प्राणपणाने लढलो त्याला ईतिहासात तोड नाही .,,कारण विश्वास.
आमचे पूर्वज एका भीम पराक्रमाचे दावेदार साक्षीदार मरहट्टे ज्यांनी
अटकेपार झेंडे रोवले यवनांना पाळता भुई थोडी केली .
ईतकी त्यानंतर म्लेन्छांनी परत वाकड्या नजरेने हिंदुस्थान कडे पाहिलं नाही.,,कारण विश्वास.
कारण त्यांना माहित होत,"अरे बचेंगे तो और भी लडेंगे  " अस गरजणारा
सिंहाच्या हि जबड्यात घालून हात मोजीन त्याचे दात चा मरहट्टा
दत्ताजी शिंदे कदाचित तिथे उभा असेल,,,,,,कारण विश्वास.
ह्याच विश्वासावर ज्यांचा विश्वास आहे त्यांची गोष्ट येथे मला सांगावीशी वाटते .
दुसर्या महायुद्धाची ,,
जपानने त्या युद्धात उडी घेतली एक आघाडी त्यांनी फिलिपिन ऑस्ट्रेलिया विरुध्द
उघडली आणि ईतर आघाड्यांवर भरभर प्रांत जिंकणाऱ्या जपान्यांच्या पराक्रमाला ईथे मात्र खीळ बसली ,
फिलिपिनी जनतेने त्यांना चांगलेच रोखून धरले .
एक पाऊलही त्यांना पुढे टाकता येत नव्हते,
आपल्या संपूर्ण ताकदीनिशी जपानी धडकत होते
अखेरीस जपानची बरीचशी आक्रमक शक्ती वाया घालवल्यावर मग
फिलिपिनीहि आपले असंख्य सैनिक गमावल्यावर जपानला ,
९ एप्रील १९४१ रोजी शरण आले पण तो पर्यंत जपानी आक्रमकांचे
ईतके नुकसान झाले होते कि एक पाऊलही त्यांना पुढे तक्ता येत नव्हते .
आपल्या देशवासीयांच्या या असीम पराक्रमाचे प्रतिक म्हणून
फिलिपिनी जनता आजही
९ एप्रिल हा दिवस शरणागतीचा दिवस राष्ट्रीय शौर्याचा दिवस म्हणू
साजरा करतात .
आणि आपण अरे आपण तर लढलो पानिपतावर शेवट पर्यंत ,,,,,,,,,
प्रसंगी नदी किनारीची शाडूची माती खात झाडाझुडुपाचा पाला खात .
जगलो आणि लढलोही.
कारण आखिल
हिंदुस्थानचे रक्षणकर्ते कोण असतील तर ते आणि केवळ ते मराठे,,,,,,,हा होता विश्वास .
एक मात्र नक्की राज्यकर्ते त्याही वेळी निर्णय घेण्यास चुकले आजही .
गांधीबाबा सारखी राष्ट्रीय पिलावळ आजही पोसत आहेत ज्यांच्या मुळे या
देशाच्या स्वातंत्र्याच पानिपत झाल.
या रणभूमी वरच मराठयांच शौर्य ईतक होत कि स्वतः
अब्दाली म्हणतो ,
"मराठ्यांचे हे शौर्य पाहण्यासाठी आमचे रुस्तम आणि ईस्क्न्दार
त्यांचे कृशानार्जुन हवे होते मराठ्यांचा हा भीम पराक्रम पाहून
त्यांनी देखील आश्चर्याने तोंडात बोटे घातली असती .
मराठ्यांची हि युध्द लालसा आणि खुमखुमी ईतरान कडे दिसणे अशक्य .
आणि मराठ्यांना हे सार जमा कारण केवळ .....विश्वास.
दिल्ल्ही पासून काही तासांच्या अंतरावर पानिपत
काला आम जिथे हा पानिपतचा रणसंग्राम झाला
त्या रंगानातील ती पांढूर्की  माती कपाळी लावायचं  भाग्य मिळाल
या मातीत म्हणे ,
महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील वीर ईथे लढला आपल्या हिंदुस्थानसाठी,
त्याच्या रक्तामांसाचे येथल्या मातीत रुपांतर झाले आहे.
न जाणो माझ्या घरातील कुणी गेल असेल कुणी लढल असेल
नाहीतर ईथे फिरून परत येण्याचा योग तो काय कारण काय केवळ ,,,,विश्वास 

1 comment:

  1. हे फक्त मरहट्टेच करू शकतात.

    ReplyDelete