छत्रपति शिवाजी महाराज, संभाजी राजांना म्हणतात .........
“त्या रुद्र-शंकरास
देवदेवतांच्या कल्याणासाठी विष पचविणे पडले. त्याचा कंठ काळानिळा पडला. पण
देवदेवतांचे गळे सलामत राहिले. या श्रींच्या राज्यासाठी, या
मावळमाणसांच्यासाठी तुम्हा-आम्हासहीअसे विष पचवावे लागेल. रुद्राने ते एकदा
केल. तुम्हां-आम्हालाते प्रसंग पडला तर कैकवेळा करावे लागेल.
पंडित शिकवण देतात, ‘राजा हा विष्णूचा अंश आहे’. पण त्यांना ठाव नसते की
राजा हा प्रथम शंकराचा अंश असतो आणि मग असलाच तर विष्णूचा. आम्ही त्यासाठीच
‘शिवलिंग’ पुजतो.
शंभुराजे, रुद्राने रुद्रासारखेच राहावे .....
रुद्रासारखेच वर्तावे .....”
संदर्भ - छावा (शिवाजी सावंत )
No comments:
Post a Comment